25 April 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला ते पत्र मिळणं अशक्य - किरीट सोमय्या

DHFL, Wadhwan Family, Sharad Pawar

मुंबई, १० एप्रिल: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट करत कायदा सर्वांसाठी समान असल्याचे नमूद केले. विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून महाबळेश्वरला जाण्यासाठीचं परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांचा या सर्व प्रकरणामध्ये हात असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार याबाबत प्रत्युत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

News English Summary: Former BJP MP Kirit Somaiya has now made serious accusations against Sharad Pawar, the president of NCP directly. Without the support of Sharad Pawar, the Wadhwan family has been told that it is impossible to get a permit from the Home Secretary to go to Mahabaleshwar. Kirit Somaiya has claimed that Sharad Pawar has been involved in all these cases. Therefore, now everyone is wondering whether Sharad Pawar will respond.

News English Title: Story BJP leader Kirit Somaiya said NCP President Sharad Pawar had hand his letter DHFL Wadhavan family Corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x