29 March 2024 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

कोरोना आपत्ती: टवाळखोरांनी पोलिसाचा तलवारीने हात छाटला

Corona Crisis, Covid19, Punjab Police Attacked

चंदीगड, १२ एप्रिल: लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.

पंजाबच्या पटियाला येथील मोठ्या भाजी मंडी सनाऊर रोडवरील कर्फ्यू दरम्यान लोकांनी पोलrस पथकावर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की चार-पाच ‘निहंगा’ (शिख पारंपारिक शस्त्रे परिधान केलेले आणि निळे लांब शर्ट घातलेले) कारने फिरत होते. मंडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सकाळी सव्वा सहा वाजता भाजी मार्केटजवळ थांबण्यास सांगितलं. पटियालाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीपसिंग सिद्धू म्हणाले, “त्यांना (कर्फ्यू) पास दर्शविण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी त्यांच्या कारन लावलेल्या ब्लॉकर्सना धडक दिली.”

रविवारी सकाळी ही घटना घडली. हरजित सिंह असे या सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. हरजित सिंह यांना जवळच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना चंदीगढ येथे हलवण्यात आलं. पटियालाचे पोलीस उपअधीक्षक मनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हल्ला केल्यानंतर हे टोळके घटनास्थळावरू फरार झाले. पोलिसांनी या टोळक्याचा पाठलाग केला. हे टोळके बलवाडा येथील एका गुरूद्वारात लपले आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल,’ असं ते म्हणाले.

 

News English Summary: In Punjab, a shocking incident has happened in Punjab when a gang of men walking by the road cut off the hand of a police officer with a sword. Some more policemen were critically injured in the incident. The people who attacked the police were the Nihanga faction (the Sikh cult with traditional weapons). They were all driving around in the vicinity of Sanor Vegetable Market. At this time the police asked for a curfew pass to the concerned. However, as the gang had no pass, they started arguing with the police.

News English Title: Story Corona Crisis Punjab attack on Policeman and chopped two others injured in Punjab Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x