19 April 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

देशात आतापर्यंत २२३१ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Covid 19, Corona Crisis, Union Health Ministry

नवी दिल्ली, १९ एप्रिल: एकीकडे दिवसागणिक देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशातील २३ राज्यांतील ५४ जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा एकूण वेग पाहता ही बाब भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-१९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२ हजार ९७४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर २ हजार २३१ रुग्णांना उपचारानंतर बरे झाले आहेत. यासोबतच, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील २३ राज्य/ केंद्र शासित प्रदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या २८ दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागुमध्ये कोणतीही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ७५५ डेडिकेटेड हॉस्पिटल आणि१३८९ डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. या सेंटर्सवर २१४४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

 

News English Summary: On the one hand, as the number of coronary patients is increasing day by day, the Union Health Ministry has provided a comforting information. No coronary disease has been reported in the last 14 days in 54 districts in 23 states of the country. Given the overall pace of coronary outbreaks around the world, this is considered to be very comforting for India.

News English Title: Story union health ministry says 2231 patients have been cured so far in the India Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x