25 April 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली
x

८० टक्के रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाहीत; सरकारची डोकेदुखी वाढली

ICMR, Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २१ एप्रिल: आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.

सर्दी, ताप आणि खोकला असणाऱ्यांना करोना संशयित म्हणून आयसोलेट किंवा क्वारंटाइन करण्यात येत आहे. पण दिल्लीमध्ये मागील २४ तासांत आढळलेल्या करोनाबाधित रूग्णांना सर्दी, खोकला आणि ताप या सारखी कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे अशा रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. दिल्लीत आढळून आलेल्या जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण दिसली नाही आणि हे चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १८ हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.

 

News English Summary: Dr. Padma Shri, National Head, Department of Infectious Diseases, Companion of ICMR. Raman Gangakhedkar gave this information in a press conference on Monday. “Every effort is being made to corona,” he said. But about 80 percent of the patients who tested positive showed no symptoms of corona.

News English Title: Story 80 positive cases show no or mild symptom says ICMR Report Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x