23 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

मॉल्स बंद राहणार, पण देशभरात आजपासून दुकाने उघडणार

Union Home Ministry, Covid 19, Corona Crisis

मुंबई, २५ एप्रिल: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारनं आता दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. तसेच करोना हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. रमजानचा महिना सुरू झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

News English Summary: The home ministry issued an order late Friday night. Accordingly, all shops registered in all the states and union territories of the country are allowed to open on certain conditions. It also allows shops in residential areas to continue.

News English Title: Story Union Home Ministry allows neighborhood shops to reopen Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x