19 April 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा
x

शरद पवार पंतप्रधान व्हावे ही मनसेची प्रामाणिक इच्छा : बाळा नांदगावकर

कऱ्हाड : देशभरात मोदींविरोधात तिसरी आघाडी जोर धरू लागल्याने तसेच त्या तिसऱ्या आघाडीचे नैतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने करावे अशी राजकीय चर्चा अनेक पक्ष करत आहेत आणि त्यासाठी दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरु झाले आहे. सर्व पक्षांची मोठं बांधण्यात सध्याच्या घडीला शरद पवार हेच उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, जर भविष्यात एक मराठी अनुभवी राजकारणी पंतप्रधानपदी विराजमान होणार असेल तर मनसे पक्ष नेहमीच शरद पवारसाहेबांच्या पाठीशी एक मराठी माणूस म्हणून नेहमीच ठाम पणे उभा राहील. बाळा नांदगावकर सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते कऱ्हाड मधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार ही दोन्ही नैतृत्व प्रचंड लोकप्रिय असून, एक तडफदार तरुण नेता आणि दुसरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जाणता नेता म्हणून ओळख असलेले शरद पवार जर एकत्र आले तर बरीच राजकीय उलथापालथ होऊ शकते असे जाणकारांचे मत होते. दोन्ही पक्षांची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातले समजूतदार नेते म्हणून परिचित आहेत. दोघेही राजकारण आणि व्यक्तिगत नात्यात कधीच गल्लत करत नाहीत.

परंतु राज ठाकरे यांनी शरद पवारांची घेतलेल्या मुलाखतीमागे कोणतेही राजकारण नव्हते अशी प्रतिक्रिया ही बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिली.

हॅशटॅग्स

#Raj Thakarey(78)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x