19 April 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

महाराष्ट्रात लॉकडाउन ४ दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद...सविस्तर

Maharashtra, Lockdown 4

मुंबई, १७ मे : राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी पत्राद्वारे सर्व विभागांना कळवलं आहे. ‘राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असेल,’ असं अजॉय मेहता यांनी पत्रात म्हटलं आहे.

राज्यात काय सुरु राहणार?

  • दूध, भाजी, फळ, बेकरी मांस, मासे, अंडी विकणारी दुकानं, साठवणारी गोदामं आणि त्यांच्या दळणवळण सेवा
  • प्राण्यांचे दवाखाने, पेट्रोल पंप, घरगुती गॅस पुरवणाऱ्या संस्था, तेल कंपन्या, त्यांची गोदामं आणि दळणवळण व्यवस्था
  • अन्न, औषधं आणि किराण्याची डिलिव्हरी करणाऱ्या ई-कॉमर्स, ऑनलाईन डिलिव्हरी सेवा
  • सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारी संख्येसह चालू राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ३ फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. कार्यालयीन ठिकाणी हात धुण्याची सुविधा आणि हँड सॅनिटायझर आवश्यक आहे.
  • औषधं बनवणाऱ्या फार्मा कंपन्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ बनवणारे युनिट्स, डाळ आणि तांदळावर प्रक्रिया करणारे युनिट्स आणि जनावरांसाठी चारा बनवणाऱ्या संस्था चालू राहतील.
  • बँका, एटीएम, इन्शुरन्स कंपन्या आणि वित्तसंस्था
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं
  • आयटी, टेलिकॉम, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर, पोस्ट, इंटरनेट आणि डेटा सेवा
  • जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि ने-आण करणाऱ्या संस्था
  • शेतीच्या उत्पादनांची आयात व निर्यात करणाऱ्या संस्था

राज्यात काय राहणार बंद?

  • खासगी बस, मेट्रो, लोकल बंदच राहणार आहेत. दोन प्रवाशांपेक्षा अधिक व्यक्तींची ने-आणि टॅक्सीने करता येणार नाही, तर रिक्षात फक्त एका प्रवाशासाठी परवानगी आहे.
  • तसंच खासगी गाड्यांना जीवनावश्यक गोष्टींची खरेदी आणि आरोग्यविषय समस्या यासाठीच रस्त्यावर येण्याची परवानगी आहे, पण गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर आणि दोन व्यक्ती यांनाच प्रवास करता येईल.
  • सगळ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. तसेच सामान्य नागरिकही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतरही त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
  • होम क्वारंटाइन असणाऱ्या लोकांना त्याचे नियम पाळावे लागतील. त्यांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यक्तींना सरकारी क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात येईल.
  • पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी कायम आहे.
  • अत्यावश्यक सेवा वगळल्यास सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील.
  • सगळी प्रार्थनास्थळं सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. पुजाऱ्यांना आतमध्ये पूजा करण्याची किंवा धर्मगुरूंना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल.

 

News English Summary: Chief Secretary Ajoy Mehta has informed all the departments in a letter that the lockdown in the state has been extended till May 31. ‘The government has decided to increase the lockdown to maintain the prevalence of corona in the state. Therefore, the lockdown in the state will continue till midnight on March 31, ‘said Ajoy Mehta in the letter.

News English Title: What service is on and off duirng Lockdown 4.0 in Maharashtra News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x