28 March 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

महाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर

Corona Crisis, Covid 19, Maharashtra

मुंबई, २० मे: सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले ४१ मुंबईतले,नवी मुंबईतले ३, उल्हासनगर २, पुण्यातले १३, पिंपरी चिंचवड २,औरंगाबाद – २, सोलापूर – २ असे रुग्ण दगावले आहेत. आज राज्यात २२५० रुग्णांचं नव्याने निदान झालं.

दरम्यान, राज्यात कोरोनाव्हायरसचा कहर वाढत असला, तरी एक दिलासादायक आकडा आज समोर आला आहे. आतापर्यंत राज्यातल्या १०,३१८ लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील २४ तासात ६७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत बुधवारी दिवसभरात १,३७२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा आकडा २३ हजार ९३५ वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या ८४१ इतकी झाली आहे. बुधवारी मुंबईत ४१ जणांचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली.

 

News English Summary: A total of 2,250 patients were diagnosed with corona in the state on Wednesday. As a result, the number of patients has gone up to 39,297. So far 10 thousand 318 patients have recovered and returned home. State Health Minister Rajesh Tope gave this information.

News English Title: Corona virus Positive Patient Increased In Maharashtra News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x