25 April 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

मुंबईतून IFSC बाहेर हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं - संजय राऊत

BJP Party, MP Sanjay Raut

मुंबई, २२ मे : महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतानाच राज्यात राजकारणही पेट घेत आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी भाजपने ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी या आंदोलनाला सुरूवात झाली असून अनेक बडे नेते हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसनं याला ‘भाजप बचाओ’ आंदोलन असं म्हटलं आहे. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. भाजपचे नेते काळे झेंडे घेऊन राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भाजपच्या या आंदोलनावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे फक्त भाजप नेत्यांचं आंदोलन होतं. जनता यात सामील झाली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत. भाजपने मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला पाहिजे होते,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. आंदोलन अपयशी ठरल्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याने ते टीका करत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: The BJP is launching a Maharashtra Bachao Andolan, accusing the state government of failing to fight the corona virus. BJP leaders have taken to the streets against the state government with black flags. Shiv Sena has criticized this agitation of BJP.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut targets BJP Party over protest during corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x