29 March 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

स्थलांतरित मजुरांसाठीचे १२२ कोटी आणि GST'चा परतावा केंद्राकडून मिळालेला नाही - अनिल परब

Mahavikas Aghadi, minister Anil Parab, Devendra Fadnavis

मुंबई, २७ मे: महाविकास आघाडी सरकारची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांना महाविकास आघाडीकडून चोख प्रत्युत्तर दिलं देण्यात आलं. केंद्र सरकारने केलेल्या मदतीचा आकडा हा आभासी असून प्रत्यक्षात तितकी मदत राज्याला मिळालेली नाही, असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेली पत्रकार परिषद ही आभासी होती. यातून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात आली असल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करू असं, केंद्राने सांगितलं होतं. मात्र तसं काहीही नाही, असं स्पष्टीकरण देत परब यांनी केंद्राकडून आलेली मदत ही पूर्णपणे राज्याला मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान गरिब कल्याण योजनेच्या अंतर्गत गहू, तांदूळ, डाळ अशी केंद्राने मोठी निर्णय केली असे फडणवीसांनी सांगितले. पण १७५० कोटींचे गहू दिल्याचे त्यांनी सांगितले पण इतका गहू मिळाला नाही. १२२ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिल्याचे ते म्हणाले, पण अजून धान्य निघाले नाही आणि मजूर गावाला पोहोचले देखील आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ६००० देत होते. हे आधीच दिले होते. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना ११६ कोटी केंद्राने दिल्याचे ते म्हणाले. पण १२१० कोटी राज्य सरकार देत हे त्यांनी सांगितले नाही. ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचे पैसे ६८ कोटी रुपये राज्य सरकारने दिले. कुठल्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाहीत.

भाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. करोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते राजकारण करत आहेत असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत असंही थोरात म्हणाले.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government held a joint press conference today. State Transport Minister Anil Parab, Revenue Minister Balasaheb Thorat and Water Resources Minister Jayant Patil addressed the press conference. The Mahavikas Aghadi responded to the allegations made by the opposition against the Thackeray government.

News English Title: Mahavikas Aghadi government minister Anil Parab slams Devendra Fadnavis allegations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x