26 April 2024 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात - डोनाल्ड ट्रम्प

WHO, World Health Organization, US President Donald Trump

वॉशिंग्टन, ३० मे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीन नेहमीच काही गोष्टी लपवत आला आहे. कोरोना विषयावर चीनकडून उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्यांना संपूर्ण जगासमोर उत्तर द्यावे लागेल. त्याचप्रमाणे ट्रम्प पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना पूर्णपणे चीनच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे नाते संपुष्टात आणत आहोत.

वर्षाला ४० मिलियन डॉलर इतकी कमी रक्कम देवूनही WHOवर चीनचे नियंणत्र आहे. डब्ल्यूएचओ चीनच्या नियंत्रणाखाली आहे तर अमेरिका वर्षाला ४५० मिलियन डॉलर्स देत आहे.ही रक्कम अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे. कोरोना थांबविण्यास डब्ल्यूएचओ सुरुवातीच्या टप्प्यात अपयशी ठरला, कारण आता सुधारणेची गरज आहे, म्हणूनच आज आम्ही डब्ल्यूएचओ बरोबरचे आपले संबंध संपवत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद वाढत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या काही नागरिकांवर अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसंच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या गुंतवणुकीच्या नियमदेखील अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनच्या विरोधात मोठी पावलं उचलण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक सादर करण्यात आलं होतं.

चीनच्या नव्या संरक्षण कायद्याच्याविरोधात हाँगकाँगसोबत विशेष ट्रेड डिल संपुष्टात आणणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. शुक्रवारी माध्यमांना संबोधित करताना त्यांनी या घोषणा केल्या. तसंच हाँगकाँगमधील प्रवसासाकरिता अमेरिकन नागरिकांसाठी एक नवी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे चीनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येक आहे.

 

News English Summary: US President Donald Trump has once again attacked China over the issue of the corona virus. Trump has similarly cut ties with the World Health Organization. He has decided to leave the WHO.

News English Title: America terminated relationship with the World Health Organization announced by US President Donald Trump News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x