29 March 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

पुणे: ६ महिने वेतन न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

Employees of Kashibai Navale Medical College, Pune protest, for salaries

पुणे, ३० मे: पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाने गेल्या ६ महिन्यांचे वेतन थकवल्याने कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले आहे. कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमून निदर्शन केली. गेल्या डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचं वेतन रुग्णालय प्रशासनाने थकवलं आहे. त्यामुळे आज कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलनाचं पाऊल उचललं.

पुण्यात गेल्या १५-२० दिवसांपूर्वी शहरी भागापुरता मयार्दीत असलेला कोरोना विषविषाणुचा संसर्ग आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. शुक्रवार (दि.२९) रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागात एका दिवसांत २५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली असून, यात एकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा प्रादुर्भाव सुरूवातीला दीड -दोन महिने शहरी भागापुरता मर्यादित होता. ग्रामीण भागात रुग्ण सापडले ते देखील नगरपालिका क्षेत्रात आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरालगतच्या गावांमध्ये देखील कोरोना पसरला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ३०२ नवीन कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली. यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ७ हजार ३१४ झाली आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत एकूण मृत्यू ३२१ झाले आहेत.

 

News English Summary: Employees of Kashibai Navale Medical College and Hospital in Pune have started agitation today as their salaries have been exhausted for the last six months. A large number of workers gathered outside the hospital to protest.

News English Title: Employees of Kashibai Navale Medical College and Hospital in Pune protest for their salaries News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x