25 April 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या कोविड सेंटरमधून रुग्णांना हलवण्याचं काम सुरु

BKC Covid Center, Mumbai, Cyclone Storm

मुंबई, २ मे: कोरोना महामारीच्या संकटाबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून जाणार आहे. या वादळाचा फटका रत्नागिरी, ठाणे, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि पालघर व डहाणू येथे एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून मुंबईमध्ये तटरक्षक दल, नौ दल, मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच मुंबईतील महापालिकेच्या २४ विभागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या शेकडो बोटींना किनार्‍यावर बोलवण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये २६ जणांची एनडीआरएफची टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे. रत्नागिरीमध्ये कोस्ट गार्डदेखील तयारीत आहेत. चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने एका विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या टीम पोहोचल्या आहेत.

वादळाच्या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानातील कोविड सेंटर येथून कोरोना रुग्णांना हलविण्यात येत आहे. या सर्व रुग्णांना वरळीच्या एनएससीआय आणि गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये शिफ्ट केलं जात आहे. बसच्या माध्यमातून रुग्ण हलवण्याचं काम सुरु आहे.

आतापर्यंत चार बसमधून १०० हून अधिक रुग्णांना बीकेसीच्या एमएमआरडीएमधून वरळी आणि गोरेगाव येथे हलविण्यात आलं आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे. बीकेसीच्या कोविड सेंटरमध्ये सध्या एकूण २४२ कोरोना रुग्ण आहेत.

 

News English Summary: Corona patients are being evacuated from the Covid Center at BKC’s MMRDA grounds in the wake of the storm. All these patients are being shifted to NSCI, Worli and Kovid Center, Goregaon. Work is underway to move the patient by bus.

News English Title: Work began to evacuate corona patients from BKC Covid 19 center in the wake of the storm News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x