25 April 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
x

होय कोरोना वाढतोय, 'हि' तयारी करावी लागणार; मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात कबुली

Covid 19, Corona Virus, India, Supreme Court of India

नवी दिल्ली, ४ जून: केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले. यात, ‘देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर मेकशिफ्ट हॉस्पिटल्स तयार करावे लागतील,’ अशी कबूली केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, सध्या असलेल्या रुग्णालयांशिवाय, भविष्यात कोरोनाबाधितांसाठी मेक शिफ्ट रुग्णालयेदेखील तयार करावी लागतील. जेने करून कोरोनाबाधितांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल. सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले, की सध्या फ्रंटलाइन सर्व्हिस देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नरत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दररोज वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होत असल्याने सध्या परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मागील २४ तासात देशात ९३०४ कोरोनाग्रस्त आढळून आले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीची माहीती दिली आहे.

देशभरात सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात सध्या ७४८६० कोरोनाबाधित आहेत. यापैकी ३२ हजार ३२९ जणांनी कोरोनावर मात कली आहेत. तर २५८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.

 

News English Summary: The central government on Thursday filed an affidavit in the Supreme Court against the backdrop of the corona virus crisis. In it, ‘the number of corona patients in the country is steadily increasing. In such a scenario, a large number of make-shift hospitals will have to be set up in the country, ‘the central government has admitted.

News English Title: Central govt said in sc need of large number of makeshift hospitals for coronavirus patients News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x