20 April 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राज्यात २९३३ नवे कोरोना रुग्ण, तर १२३ रुग्णांचा मृत्यू

Covid 19, Maharashtra, Health Minister Rajesh Tope

मुंबई, ४ जून: राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये २९३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर ३.४८ टक्के राज्यात १२३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७१ रुग्ण होते. तर ४४ रुग्ण हे वय ४० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. ८ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते.

कोविड १९ च्या चाचणीसाठी आजपर्यंत पाठवलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार २९३ लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६४ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाख ८५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या १८ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. तर १ लाख ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६४ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाख ८५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या १८ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. तर १ लाख ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: In the state today, 1352 patients have overcome corona and so far 33 thousand 681 people have fully recovered. Also today, 2933 new patients have been added and 123 people have lost their lives. As a result, the total number of corona victims is now 77 thousand 793. At present, there are 41,393 active patients, said Health Minister Rajesh Tope.

News English Title: The Current Count Of Covid19 Patients In The State Of Maharashtra Is 77793 Newly 2933 Patients Have Been Identified As Positive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x