28 March 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

VIDEO - चीनकडून भारताला थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात

China shows fear, India, hydrogen bomb, Galwan vall

नवी दिल्ली, १७ जून : लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये असणाऱ्या भागात १५-१६ जूनला रात्री भारत आणि china चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. हे स्वरुप इतकं हिंसक होतं की यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. शेजारी राष्ट्राच्या अर्थात चीनच्या सैन्यातील जवळपास ४३ जवानांनाही यात प्राण गमवावे लागले. सीमावादाच्या या मुद्द्याला मिळालेलं चिंता वाढवणारं हे वळण पाहता चीननं कांगावा करण्यासही सुरुवात केली.

परिस्थितीचं गांभीर्य पाहता इथं भारतात चर्चा आणि बैठकांच्या सत्रांना वेग आला. अखेर India-China Clash आणि violent face off नंतर चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरिय चर्चा झाली. ज्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परखडपणे देशाची भूमिका मांडली.

गलवानमध्ये जे काही घडलं ते पूर्वनियोजित आणि साचेबद्ध पद्धतीनं घडवून आणण्यात आलं होतं. ज्याचे परिणाम म्हणजे या सर्व घटना आहेत, असं जयशंकर यांनी चीनला खडसावलं. दोन्ही देशांनी चीनचे पचर्चेच्या मार्गानं या वादावर तोडगा काढण्यास सहमती दर्शवली असली तरीही भारताकडून तीव्र शब्दात नाराजी मात्र स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, चीनने भारताला आता थेट हायड्रोजन बॉम्बची भीती दाखवायला सुरुवात केली आहे. जगात शांततेचे ढोंग करणाऱ्या चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्‍लोबल टाइम्‍सने 1967मध्ये हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच बरोबर, हा हायड्रोजन बॉम्ब स्वसंरक्षणासाठी असून आपला देश अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही, या सिद्धांतावर कायम असल्याचे म्हटले आहे.

ग्‍लोबल टाइम्‍सने लिहिले आहे, ‘आजच्याच दिवशी 1967मध्ये चीनने आपल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. चीन निष्‍ठापूर्वक स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्र धोरण राबवित आहे आणि अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या सिद्धांतावर कायम आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने हायड्रोजन बॉम्बच्या परीक्षणाचा हा व्हिडिओ, भारत आणि अमेरिकेसोबत त्याचा तणावर शिगेला पोहोचलेला असतानाच पोस्ट केला आहे.

 

News English Summary: China is now directly threatening India with a hydrogen bomb. The Global Times, China’s official newspaper that pretends to be world peace, has posted a video of a 1967 hydrogen bomb test. At the same time, it is said that the hydrogen bomb is for self-defense and that our country will not use nuclear weapons in the first place.

News English Title: China shows fear of hydrogen bomb to India after nefarious act in Galwan vall News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x