25 April 2024 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ; वाहन धारक हैराण

Petrol Diesel Price Hike

मुंबई, १८ जून : मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आज सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ५३ पैशांनी, तर डिझेल ६४ पैशांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता पेट्रोलसाठी ७७ रुपये ८१ पैसे आणि डिझेलसाठी ७६ रुपये ४३ पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबईत आज पेट्रोल ८४.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८४.३८ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागू होतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती.

 

News English Summary: The lockdown, which has been going on for the last two and a half months, has hit the country’s economy hard. On the other hand, the daily increase in fuel prices has brought the common man to a standstill. Today is the twelfth consecutive day of fuel price hike. Today, petrol has gone up by 53 paise and diesel by 64 paise.

News English Title: Today petrol diesel prices increase continue 12th day News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x