26 April 2024 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

केंद्र सरकार चीनला दिलेलं टेलिकॉम उपकरणांचं मोठे कंत्राट रद्द करणार

China India, Ladakh Clashes, MTNL BSNL

नवी दिल्ली, १८ जून : भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. दोन्हींकडून सीमेवर आक्रमकता पाहायला मिळाली आहे. चीनकडून सीमेवर हिंसक झडप घातल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारने सरकारी आणि खासगी कंपन्यांत चिनी उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील चिनी उपकरणे वापरण्यास सरकारने बंदी घातली आहे.

टेलिकॉम मिनिस्ट्रीने सांगितले की, बीएसएनएलच्या 4G अपग्रेडेशनचे जुने टेंडर रद्द करण्यात येणार आहेत. हे टेंडर रद्द झाल्यानंतर चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. चीनची कंपनी ZTE चा BSNL सर्वात मोठा ग्राहक आहे. सेवा क्षेत्रामध्ये बीएसएनएलला मदत केली जाते. खासगी कंपन्या आधीपासूनच चीनवरील अवलंबित्व कमी करत आहेत. रिलायन्स जिओने ५ जी साठी चीनची कोमतीही मदत घेतली नसल्याचे अंबानी यांनी आधीच स्पष्ट केले होते. तर सध्या ZTE भारती एअरटेलसाठी 2 सर्कल आणि व्होडाफोनसाठी पांच सर्कलमध्ये काम करते. ZTE ही चीनची टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची साहित्य निर्माण करणारी कंपनी आहे.

तसेच डीओटीने सर्व खासगी कंपन्यांना चिनी उपकरणे वापरणे बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. जुन्या निविदा रद्द केल्या जातील आणि नवीन सरकारी निविदा काढल्या जातील, जेणेकरुन चीन त्यात भाग घेऊ शकणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

News English Summary: The central government has ordered a ban on the use of Chinese equipment in government and private companies. The government has banned the use of Chinese equipment between state-owned BSNL and MTNL.

News English Title: The government has banned the use of Chinese equipment between state-owned BSNL and MTNL News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x