20 April 2024 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मणिपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का, राज्य सरकार कोसळणार

Manipur, Congress Govt, BJP

इम्फाळ, १८ जून : आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेलं सत्तानाट्य आणि रात्रीत बदललेला राजकारणाचा खेळ अजून जनता विसरलेली नाही. आता त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे ईशान्येकडच्या राज्याने. मणिपूरमधल्या भाजप सरकारला पुन्हा एकदा रात्रीतच धक्का बसला आहे, तेही उपमुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे.

एका रात्रीत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. पण अवघ्या तीन दिवसात या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत भाजपला धक्का दिला आणि भाजपचं सरकार अगदीच अल्पजीवी ठरलं. आता मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार संकटात सापडलं आहे. उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंग यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं आहे.

आता मणिपूरमध्ये राष्ट्रीय जन पक्षाचे चार, तृणमूल काँग्रेस एक आणि एका अपक्षाने पाठिंबा काढत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुभाषचंद्र सिंह, टीटी होईकीप आणि सॅम्युअल जेंदेई या तीन भाजप आमदारांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे.

9 आमदारांनी साथ सोडल्यानंतर बिरेन सिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. तसेच आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री ओक्रम इबोदी सिंग हे मणिपूरचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असा दावा देखील काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

2017 मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यीय विधानसभेत 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. परंतु भाजपला चार एनपीपी, चार एनपीएफ, एक लोजप, एक तृणमूल, एक अपक्ष आणि एक कॉंग्रेस बंडखोर अशा 12 जणांचा पाठिंबा मिळवून बहुमत गाठता आले. बिरेनसिंग सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे अन्य सात आमदारही सामील झाले होते.

 

News English Summary: In Manipur, four Rashtriya Jan Paksha, one Trinamool Congress and one Independent have announced their support for the Congress. Three BJP MLAs, Subhash Chandra Singh, TT Hoikip and Samuel Zendei, have resigned.

News English Title: In Manipur four Rashtriya Jan Paksha one Trinamool Congress and one Independent have announced their support for the Congress News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x