20 April 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं? - राहुल गांधीं

Ladakh, India China, PM Narendra Modi, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २० जून : भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली होती. यानुसार शुक्रवारी मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यामध्ये देशाची एक इंचही जागा कोणाच्या ताब्यात गेलेली नाही, एकही पोस्ट चीनच्या ताब्यात गेलेली नाही, असे स्पष्ट केले होते. यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत.

प्रत्यक्ष सीमारेषेवरील ताण कमी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत व चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरू होती. एकीकडे चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. २० जवानांच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर विरोधकांनीही सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारनं तातडीनं विरोधकांशी चर्चा केली. त्याचबरोबर चीनने भारतीय भूभागात प्रवेश केला नसल्याचंही सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी निवेदन केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले आहेत. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi made it clear in an all-party meeting on Friday that no inch of India’s land is in anyone’s possession and no one has infiltrated the Indian border. Former Congress president Rahul Gandhi has leveled serious allegations against Modi.

News English Title: Galwan Valley Rahul Gandhi Asked Question To Pm Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x