23 April 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा
x

नेपाळचे मंत्री सत्ताधाऱ्यांवर डोळे वटारतात..कृष्णकुंजवर सलाम ठोकतात..काही कळेना

Nepal Minister, PM Narendra Modi, Raj Thackeray, Krushnakunj

मुंबई, २० जून : भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या आणि नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. विशेष म्हणजे भारताशी वैर पत्करून चीनशी मैत्री करण्यावर नेपाळने भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

एका बाजूला भारत सरकारकडे दुर्लक्ष करणारं नेपाळ सरकारने सध्या चीनच्या सरकारसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची सपाट लावल्याचं देखील वृत्त आहे. ज्या वेळी भारतासोबत नेपाळचे संबंध बिघडलेले असताना आणि चीन – भारत यांच्यात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, चीनसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सची चर्चा देखील नेपाळच्या वृत्तपत्रांमध्ये रंगली आहे.

भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात दोन दिवसांपूर्वी नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयकावर मतदान पार पडलं. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे.

नेपाळने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने नॅशनल असेंब्लीत ५७ मते पडली. तर विरोधात कुणीही मतदान केले नाही. त्यामुळे हे विधेयक नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारीत झाले. मतदानादरम्यान, संसदेतील विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी-नेपाळ यांनी घटनेच्या तिसऱ्या अनुसूचित बदल करण्यासंबंधीच्या सरकारच्या विधेयकाला पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये नेपाळचा दौरा देखील होता त्याची जोरदार चर्चा देखील झाली होती. मात्र मोदींनी नेपाळसोबत नेमकं कोणतं सलोख्याचं नातं निर्माण केलं हाच आज कळीचा मुद्दा झाला आहे. कारण नेपाळचे मंत्री संत्री सत्ताधाऱ्यांना दुर्लक्षित करून उलट डोळे वटारत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात एक घटना घडली होती त्याची आज आठवण आली आहे.

नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी फेब्रुवारी महिन्यात कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना नेपाळचे केंद्रीय मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं होतं. त्या भेटीबद्दल स्वतः राज ठाकरे यांनी ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली होती.

 

News English Summary: Nepal’s Industry and Commerce Minister Lekhraj Bhatta had paid a courtesy call on Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray at Krishnakunj in February. It is noteworthy that Raj Thackeray’s party had no place or involvement in the state or at the center, so it was surprising that Nepal’s Union Minister Lekhraj Bhatta met Raj Thackeray.

News English Title: They turn a eye to the central government and salute at Krishnakunj News latest Updates.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x