29 March 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

लडाख सीमेवर चिनी एअर फोर्सच्या हालचाली, फॉरवर्ड एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात - भारतीय वायुदल

India China, Ladakh, Indian Air Force

हैदराबाद, २१ जून : लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्‍बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.

भदौरिया म्हणाले, आयएएफला चिनी एअरबेसेस आणि एलएसीजवळ त्यांच्या एअरक्राफ्ट्सच्या तैनातीसंदर्भात माहिती आहे. गर्मीच्या दिवसांत नॉर्मल अभ्‍यास सुरू असतो. मात्र, यावेळी आम्हाला नेहमीपेक्षा अधिक विमानांची तैनाती दिसून आली आहे. आपण आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.”

आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. “गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही.”

दरम्यान, गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

 

News English Summary: In Ladakh, the movement of Chinese air force along the Indo-China border has increased. Since then, the Indian Air Force has also deployed fighter jets at its forward bases. IAF Chief Air Chief Marshal Rakesh Kumar Singh Bhadauria said this on Saturday.

News English Title: In Ladakh the movement of Chinese air force along the Indo China border has increased said IAF News Latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)#IndianAirForce(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x