29 March 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

भाषिक-प्रांतीय राजकारणात रस नाही, पण मुंबई पुण्यातील गर्दी रोखणं गरजेचं - गडकरी

Nitin gadkari, Mumbai Pune Crowed

मुंबई, २७ जून : कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी ‘झी २४ तास’च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापाऱ्याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याचा सविस्तर उहापोह केला.

मात्र, यावेळी त्यांनी भविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील लोकसंख्या कमी करण्याची गरज व्यक्त केली. मला प्रांतीय आणि भाषिक राजकारण करायचे नाही. मात्र, मुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोनाचं संकट किती गंभीर आहे, हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचं नसून मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सध्या मुंबईमध्ये करोना विणाणूचं संकट गंभीर बनलं आहे हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून करोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसंच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचं प्रमाणही कमी झालं पाहिजे, जेणेकरून पर्यटनासाठीही लोकं येतील, असं ते म्हणाले. भविष्यात पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहनं चालवण्यात यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: He expressed the need to reduce the population in cities like Mumbai and Pune in the future. I don’t want to do provincial and linguistic politics. However, Mumbai and Pune need to be deconstructed.

News English Title: Minister Nitin Gadkari Speaks About Need To Decongest Mumbai Pune Smart City Smart Village News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x