19 April 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

BLOG - 'अक्षय' राजकारणाचा डाव

मुंबई : अक्षय कुमार हा तसा माणूस म्हणून चांगला त्यात काहीच वाद नाही. किंबहुना त्याने केलेलं सामाजिक काम सुद्धा उत्तमच होतं यात कोणताच वाद नाही. परंतु अक्षय कुमार हा बॉलिवूड मधला एक उत्तम कलाकार. तो कोणी राजकारणी किंव्हा ‘मुरलेला’ राजकारणी माणूस नाही, त्यामुळे आपल्याबरोबर नक्की काय शिस्तबद्ध शिजतंय याची त्याला कल्पनाच नसावी. त्यासाठी त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. परंतु बॉलिवूड कलाकार म्हटलं की लोक त्यांच्यासाठी भावनाप्रधान असण्यापेक्षा भावनाअधीन जास्त होतात हा इतिहास आहे. परंतु एका मुसद्दी राजकारण्याच्या डाव दुसऱ्या एका चाणाक्ष आणि मुसद्दी राजकारण्याने वेळीच ओळखला आणि हाणून पाडला, कारण त्या दुसऱ्या चाणाक्ष नेत्याने ते सगळं अनुभवलं होत जे अक्षय कुमारच्या बरोबर २०११ पूर्वीच शिस्तबद्ध घडायला सुरुवात झाली होती.

अक्षयकुमार हा काही लगेचच प्रकाशझोतात आलेला कलाकार नाही, तर तो कित्येक वर्षांपासून अनेक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. जसा मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा एक मोठा चाहता वर्ग असतो, तसा तो अक्षय कुमारचा सुद्धा होता. बरं, आणि समाज सेवा म्हटलं तर आजच्या घडीला असे अनेक मोठे आणि श्रीमंत कलाकार आहेत जे समाजात खरोखरच चांगली समाजसेवेची कामे करत आहेत. सलमान खान हा त्यातीलच एक, सलमान खान हा जरा विवादित कलाकार म्हणूनच प्रसिद्ध आहे हे सत्य आहे. उदाहरणार्थ हिट अँड रण केस किंव्हा काळवीट शिकार इत्यादी. परंतु एखाद्याने त्याच विवादित सलमानच्या ‘बिंग ह्यूमन’ या समाजसेवी संस्थेचं काम स्वतःच्या डोळ्याने पाहिलं तर अवाकच होतील. त्यानंतर आमिर खान सुद्धा ‘पाणी फाउंडेशन’ मार्फत खेड्या पाड्यात उत्तम काम करत आहे. तर शाहरुख खान हा तसा सहसा समाजकारणात आणि राजकारण्यांपासून लांबच असतो.

परंतु अक्षय कुमारचा विषय राजकीय प्रकाश झोतात आला तो राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर झालेल्या सभेत. तसं त्या सभेत त्यांनी अक्षयच्या समाजसेवी कामांबद्दल काहीच टीका केली नव्हती. राज ठाकरे म्हणाले होते की, अक्षय कुमार हा मुळात स्वतः कॅनेडियन नागरिक आहे आणि तो आता भारताचे गुणगान गात आहे. परंतु त्याच भाषणात राज ठाकरें अजून एक वाक्य बोलून गेले होते आणि ते होत ‘तुमचं (म्हणजे भाजपचं) काय चालू आहे ते न कळण्याइतका मी काही दुधखुळा नाही आणि त्याचेच हे संदर्भ आम्ही देत आहोत.

राज ठाकरे यांच्याच सभेत आणि काही ठराविक वर्तमान पत्रात सुद्धा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ हे दोन स्त्री वर्गाशी संबंधित विषयांवर आधारित सिनेमे सरकार स्पॉन्सर असल्याच्या बातम्यासुद्धा झळकल्या होत्या. मुळात राजकारणात स्त्रीवर्ग खूप महत्वाची भूमिका बजावत असतो आणि प्रत्येक पक्ष हा स्त्रीवर्गाला आपल्या पक्षाकडे वर्ग करण्यासाठी वेग वेगळया युक्त्या लढवत असतो. जसे विविध पक्षांनी स्वतःच्या स्थानिक नेत्यांमार्फत विणलेले महिला बचत गटाचे जाळे. त्या राजकारण्यांच्या छताखाली बचत गटाचं आयुष्य आर्थिक दृष्ट्या किती फुलत ते परमेश्वर जाणो, परंतु तो राजकारणी मात्र याच बचत गटांचा निवडणुकीत चांगलाच फायदा करून घेतो. बर, याच बचत गटाचं जाळ ज्या पक्षांचं आहे विशेष करून ग्रामीण भागात ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या पक्षांच. मग यात भाजप कुठेच नव्हता विशेष करून ग्रामीण भागात.

मुळात अक्षय कुमार हा २०११ पासूनच मोदींच्या या ना त्या कारणावरून संपर्कात होता जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यातील एका भाषणात तर अक्षयच्या उपस्थितीत मोदी म्हणाले होते की, हम गुजराती लोग है, हम पैंसो की भाषा जल्दी समजते है. और अगर पैसे खेल से जुड जायेंगे तो गुजराती खेल से भी जूड् जाएंगे. पुढे मोदी म्हणाले अक्षय मला विचारात आहे, मोदीजी गुजरात मे तो मार्शल आर्ट होणा चाहिये. मोदींच्या त्याच भाषणात २०११ मध्ये अक्षय कुमारच्या उपस्थितीत गुजरातमध्ये ‘स्पोट्स युनिव्हर्सिटी’ बद्दल भाष्य केलं, पण देशाला किती स्पॉट्समन इथून मिळाले आणि मोदींच्या याच भाषणाप्रमाणे स्पोर्ट्स क्षेत्राने देशाला किती अरब रुपये मिळाले देव जाणोत. परंतु अक्षय कुमार बरोबर एक जवळीक झाली होती. हाच तो व्हिडिओ;

त्यानंतर गुजरातमध्येच २०११ ला तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आणि अधिकाऱ्यांशी अक्षय कुमारची भेट झाली होती. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी होणारी चर्चा अशी सर्वांसमोर आणि रेकॉर्ड करण्यामागचा उद्देश काय होता ? त्यांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ ज्यामध्ये ऑडियो नाही.

२०११ पासूनच अक्षय कुमारच्या भाजप प्रवेशाची शिस्तबद्ध बांधणी होऊ लागली होती. भाजपकडून आणि आरएसएस संबंधित संघटनांकडून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ या स्त्रियांशी संबंधित भावनिक विषयामार्फत अक्षय कुमारला प्रमोट करण्याचा शिस्त बद्ध प्रयत्नं चालू होता. एखाद-दुसरा अपवाद सोडल्यास अक्षय कुमार हा भाजप आणि भाजप संबंधित संघटनांमार्फत सिनेमा प्रमोशनच्या निमित्ताने स्त्रियांपर्यंत पोहोचवला जात होता. उदाहरणार्थ दिल्ली विश्वविद्यालयात तर सिनेमा प्रोमोशनच्या नावाने अक्षय कुमारच्या हातात थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विद्यार्थी संघटना म्हणजे ‘अखिल भारतीय विद्याथी परिषदेचा’ ध्वजच हातात फडकवायला दिला गेला. आपल्या हातात बोलण्याच्या नादात काय दिलं गेलं याची कल्पनाही अक्षय कुमारला नसावी. मुळात भारताच्या इतिहासात एखाद्या सिनेमाचं प्रमोशन कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली होण्याची ही पहिलीच वेळ असावी. तसेच भाजप महिला नेत्याच्या कार्यक्रमात त्याला ‘पॅडमॅन’ प्रमोशन च्या नावाने एखाद्या इव्हेंट सारखा सादर केला गेला. त्याचे व्हिडीओ;

मुळात एका मागून एक असे सलग १६ सिनेमे फ्लॉप जाऊन सुद्धा बॉलीवूडमधील एखाद प्रोडक्शन हाऊस करोडो रुपये लाऊन सुद्धा असं म्हणत असेल की, हे आम्ही केवळ समाजसेवेसाठी करत आहोत तर ते व्यवसायिक नजरेतून कसं स्वीकारावं हा प्रश्नच आहे.

राज्यसभेची निवडणूक आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभेचा अचूक टायमिंग निव्वळ योगायोग होता. अगदी राज्यसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अक्षय कुमारच नाव सर्वच वर्तमान पत्रात झळकत होत. परंतु राज ठाकरेंची सभा झाली आणि राज ठाकरे यांनी त्याच्या समाजसेवेबद्दल एकही शंका उपस्थित न करता, केवळ अक्षय कुमारच्या ‘कॅनेडियन नागरिकत्वावर नेमकं बोट ठेवलं’ आणि भाजपच्या सर्वच योजनांवर पाणी फिरलं होत. कारण सभेत वेळेचा विचार करता, सर्व संदर्भ देणं शक्य नसतं म्हणूनच कदाचित त्यांनी केवळ ‘कॅनेडियन नागरिकत्वावर’ बोट ठेवलं. पण २-३ दिवसांपूर्वीच एका खासगी वृत्त वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत त्याने विषय न वाढवता मोजकीच प्रतिक्रिया दिली. परंतु मुलाखत घेणाऱ्याने तिथेच उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा अक्षय कुमारला खासदारकी देणार का असा प्रश्न केला तेंव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच होकार दिला आणि तिथेच सर्व आलं.

अक्षय कुमारने भारतीय जवानांच्या मदतीसाठी केलेलं योगदान चांगली गोष्ट आहे हे मान्य आहे. त्याने त्यासाठी सढळ हाताने मदत केली हे सुद्धा सत्य आहे. परंतु एखाद्याला स्वेच्छेने भारतीय जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करायची असेल तर २०१२ पासूनच पीएमओ अंतर्गत केंद्र सरकारची ‘नॅशनल डिफेन्स फंड’ ndf.gov.in ही तरतूद असताना पुन्हा ‘भारत के वीर’ BharatKeVeer.in मागील नक्की कारण काय होत ? अक्षय कुमार करू इच्छित असलेली मदत ‘नॅशनल डिफेन्स फंड’ मार्फत करू शकला असता. मुळात अक्षय कुमारला ते ठाऊक सुद्धा नसावं, परंतु केंद्र सरकारचं ते कर्तव्य होत की त्याला ‘नॅशनल डिफेन्स फंड’ ndf.gov.in बद्दल माहिती करून द्यावी.

२०१२ मध्ये म्हणजे यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत असताना काँग्रेसला लक्ष करत एक ट्विट केलं होत. परंतु हाच अक्षय कुमार मी भारतीय असल्याचं मार्केटिंग करत असताना वेळोवेळो भाजप सोबत फिरताना दिसत होता. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेल-एलपीजी असे सर्वच दर गगनाला भिडलेले असताना अक्षय मधला तो सामन्यांचा भारतीय का गप्प आहे, असा प्रश्न भारतातील सामान्यांना आणि नेटिझन्सला पडला होता. म्हणून नेटिझन्सने त्याच तेच काँग्रेसच्या काळातील ट्विट शोधून काढलं आणि त्याला प्रश्न विचारले की अक्षय कुमार तुम्ही एक भारतीय आहात मग तुम्हाला आता त्या भारतीयांची मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे होणारी होरपळ दिसत नाही का? असा प्रश्न केला. परंतु नेटिझन्सनी अक्षय कुमारला ट्रोल करताच अक्षय कुमारने भाजपला अडचणीत आणणार ते ट्विट ताबडतोब डिलीट करून टाकलं आहे. कारण भाजपमधील अनेक जण त्याच्या संपर्कात होते. त्याची फॉलोअर्स संख्या मोठी असल्याने भांडं फुटेल म्हणून सर्व खबरदारी घेतली गेली. तेव्हाच तो भाजपसाठी काम करत होता हे सिद्ध झालं.

काय होत ते काँग्रेसच्या काळातील त्याने केलेलं ट्विट?

तो काही धुतल्या तांदळासारखा अजिबात नव्हता, तर त्याला एक अभियान राबवून भाजपशी जोडण्यात आलं. त्यामुळेच एका खासगी वाहिनीवरील कॉमेडी शो दरम्यान त्याने प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांची कन्या मलायका दुआ हिच्याशी कार्यक्रमादरम्यान घंटी वाजवताना मागे उभं राहून “मल्लिका आप घण्टा बजाओ मैं आपको बजाता हूँ!”……असं धक्कादायक विधान केलं होत. त्यानंतर सुद्धा त्याच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर त्याने स्वतः यावर भाष्य न करता पत्नीला पुढे करून सारवासारव करण्यास सांगितल्याचे सर्वांना ज्ञात आहे. आता हे असले प्रकार #MeToo मध्ये येणे सुद्धा गरजेचे आहेत असं चित्रपट श्रुष्टीतील अनेकांना वाटत आहे. काय होते त्याचे ते जाहीर कार्यक्रमातले चाळे आणि मलायका दुआला उद्देशून अश्लील वक्तव्य?

सध्याची भाजपाची उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणनंतर देशभरातील महिलांमध्ये निर्माण झालेली प्रतिमा पाहता अक्षय कुमारच्या व्यवसायिक आयुष्याचं राज ठाकरेंच्या टीकेने अप्रत्यक्ष भलचं झालं असं म्हणावं लागेल.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच नाव घोषित होण्यापूर्वी जसा २०१० पासूनच घटनाक्रम अक्षय कुमारच्या बाबतीत घडला होता. तसाच घटनाक्रम राज ठाकरे यांच्या बाबतीतही २०१४ पूर्वी नरेंद्र मोदींकडून घडवला गेला होता आणि देशभर मोदी नावाचं ब्रँड तयार व्हायला सुरुवात झाली होती हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच राज ठाकरे शिवाजीपार्कवरील सभेत मोदींना अप्रत्यक्ष उद्देशून एक वाक्य बोलून गेले होते आणि ते होत ‘तुमचं (म्हणजे भाजपचं) काय चालू आहे ते न कळण्याइतका मी काही दुधखुळा नाही. म्हणूनच म्हणालो की एका चाणाक्ष नेत्याचा खेळ, दुसऱ्या अनुभवी चाणाक्षं नेत्याने उधळला होता.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x