23 April 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

मेक इन इंडियाचा नारा देत चीनसोबत असा व्यापार वाढवला, मोदी सरकारची पोलखोल

Congress, Rahul Gandhi, PM Modi

नवी दिल्ली, ३० जून : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे.

मोदी सरकारनं काल चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना राहुल यांनी गेल्या सहा वर्षांत चीनमधून होणारी आयात कशी वाढली, याची आकडेवारी ट्विट केली. ‘आकडे खोटं बोलत नाहीत. भाजप म्हणतो मेक इन इंडिया. पण असं म्हणून ते चीनकडून खरेदी करतात,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चीनकडून होणारी आयात यांची तुलना राहुल यांनी केली आहे.

२००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत चीनकडून होणाऱ्या आयातीचं प्रमाण १४ टक्के होतं. तेच प्रमाण भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात १८ टक्क्यांवर गेलं. २००८ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चीनमधून होणारी आयात १२ टक्के होती. २०१२ मध्ये ती १४ टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर २०१४ नंतर हेच प्रमाण १३ टक्क्यांवर आलं, अशी आकडेवारी राहुल यांनी दिली आहे.

 

News English Summary: The Modi government yesterday decided to ban Chinese applications. Commenting on this, Rahul tweeted statistics on how imports from China have increased in the last six years. ‘The numbers don’t lie.

News English Title: Congress leader Rahul Gandhi attacks PM Modi government over import from china News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x