20 April 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कोरोना विशेष टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण

Corona task force Dr Sanjay Oak, tested corona positive

मुंबई, १ जुलै : महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये ज्या २४५ मृत्यूंची नोंद झाली त्यातले ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. आज जी करोना बाधितांची संख्या समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. एकूण केसेसपैकी ७५ हजार ९७९ केसेस या अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमलेल्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून एप्रिल महिन्यातच विशेष टास्क फोर्सची स्थापना केली होती. या टास्क फोर्सकडून संपूर्ण महाराष्ट्रावर नियंत्रण केलं जात आहे. त्यामुळे सतत कार्यशील असलेल्या डॉ. संजय ओक यांनाच कोरोनाची लागण झाली. आज सकाळीच त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्यावर तातडीने फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. ओक यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन देण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांच्या कोरोनासंदर्भात होणार्‍या बैठकांमध्ये डॉ. संजय ओक हे टास्क फोर्सचे प्रमुख असल्याने सहभागी होत असे. ओक यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला आहे.

 

News English Summary: President of the Corona Task Force appointed to prevent the spread of corona, Dr. Sanjay Oak has been found to be infected with corona. He is being treated at Fortis Hospital in Mulund and has been given oxygen.

News English Title: Head of Corona task force Dr Sanjay Oak tested corona positive News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x