23 April 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

आज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू

Covid 19, Maharashtra

मुंबई, ६ जुलै : राज्यात आज कोरोनाबाधितांच्या आकड्यात ५ हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आकडे समोर येत असताना आज आलेली आकडेवारी जरा दिलासा देणारी ठरली आहे. तसेच, आज २०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७ झाला आहे.

आज ३ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार २६२ रुग्ण घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातीील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के आहे. तर, राज्यात सध्या ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी राज्यामध्ये 6555 नवे रुग्ण सापडले होते. तर 151 जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यूचा आकडा वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 झाला होता. शनिवारी 7074 नवे रुग्ण सापडले होते. यामुळे महाराष्ट्राने कोरोनाबाधितांचा २ लाखांचा आकडा ओलांडला होता. याच दिवशी 295 जणांचा मृत्यू झाला होता. या तीन दिवसांच्या तुलनेत आज नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. मात्र, मृत्यूंचा आकडा चिंतेचे वातावरण निर्माण करणारा आहे.

 

News English Summary: Today, 204 patients have died. The total number of victims is 2 lakh 11 thousand 987. Today, 3,522 patients have recovered and returned home.

News English Title: Maharashtra Recorded 5368 New Covid 19 Cases And 204 Deaths In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x