25 April 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

२४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, १० जुलै : महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली आहे. कोरोनाच्या या एकूण रुग्णांपैकी ९५,६४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १,३२,६२५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ५,३६६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ४.१५ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत १२ लाख ५३ हजार ९७८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

News English Summary: Maharashtra has seen the largest increase in the number of corona patients in the last 24 hours. In the last 24 hours, the number of corona patients in the state has increased by 7862.

News English Title: 7862 New Covid19 Positive Cases 226 Deaths And 5366 People Discharged Today In Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x