24 April 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

CBSE Board दहावीचा निकाल, टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी

CBSE Class 10 Exam 2020, Results Announced

नवी दिल्ली, १५ जुलै : CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. विद्यार्थी वेबसाईट्स याशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत.

सीबीएसई दहावीच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ९९.२८ टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.

 

News English Summary: After the CBSE board announced the results of class XII on Monday, now the results of class X have also been announced today. The CBSE board has finally announced the results today after canceling the remaining exams due to lockdown and corona.

News English Title: CBSE Class 10 Exam 2020 Results Announced News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x