25 April 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

संजय राऊत पवार साहेबांचाच माणूस, नारायण राणेंचं टीकास्त्र

MP Narayan Rane, Sharad Pawar, Saamana, MP Sanjay Raut

मुंबई, १६ जुलै : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राणे म्हणाले, “सगळ्यांना माहिती आहे, करोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीका राणे यांनी केली.

यावेळी शरद पवार यांची सामनासाठी घेण्यात आलेली मुलाखत, मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये सत्ताधाऱी आणि विशेष म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेवर राणेंनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.

इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत सामनातूनच पवारांवर सर्वाधिक टीका करण्यात आली असल्यामुळं इथंच त्यांची मॅरेथॉन मुलाखत होणं ही बाब आश्चर्यकारक असल्याचा टोला त्यांनी लगावला. शरद पवार यांच्याबाबत आपल्या मनात आदराची भावना असल्याचं म्हणत तरीही काही गोष्टी मांडत राणेंनी विषयाला वळण दिलं.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • मराठा आरक्षण – समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती, मोठे वकील नेमायला हवे होते, चर्चा करायला हवी होती ते केलेलं नाहीये, तिकडे सरकारने लक्ष द्यावं.
  • फक्त बाळासाहेब ठाकरे सोडा पण उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची ही मॅरेथॉन टीका आहे.
  • भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी ही मुलाखत घेतली होती
  • संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार असले तरी ते शरद पवारांचा माणूस आहे. राऊत दिल्लीत जास्त वेळ पवारांकडे असतात. पवारांचा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे
  • गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मुंबईत कोकणात जाण्यासाठी मनाई करायला माझा विरोध आहे.

 

News English Summary: BJP leader Narayan Rane had a few days back criticized the Chief Minister for raising the issue of government worship of Vitthal in Pandharpur. After which, once again, Rane has verbally attacked the authorities.

News English Title: BJP MP Narayan Rane targets Shivsena and Saamana Sharad Pawar interview corona Maratha reservation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x