24 April 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सर्व राज्यांमध्ये गुजरातनेच सत्ता का करावी? फोडाफोडीच्या राजकारणावरून ममतादीदींचा प्रश्न

Gujarat rule, all states, West Bengal CM Mamata Banerjee, PM Narendra Modi

कोलकत्ता, २१ जुलै : सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.

वास्तविक जे घडत आहे त्याची योजनाच मुळात मोदी-शहांनी आखल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. मात्र आपत्ती काळात टीका होण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःला यापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातं. राजस्थानमधील भाजपवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं एकहाती वर्चस्व आहे आणि त्यांना दुसरा प्रतिस्पर्धी देखील नाही. तिकडे मोदी-शहांच्या नव्हे तर वसुंधरा राजेंचा शब्द अखेरचा समाजला जातो हे राजस्थान भाजपमधील वास्तव आहे.

मात्र मोदी-शहा जोडीने राजस्थानमधील सरकार उलटून लावताना यामध्ये वसुंधरा राजेंना कोणतीही कल्पना दिली नाही आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं. राजस्थान काँग्रेसमधील महत्वाचे तरुण नेते सचिन पायलट यांना हाताशी धरून मागील काही महिन्यापासून राजस्थान सरकार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सदर योजना राबवताना मोदी-शहा जोडीने वसुंधरा राजेंना प्रतिस्पर्धी म्हणून सचिन पायलट यांनी मोठं करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय.

मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये केवळ भाजपचं सरकार नको होतं, तर त्यासोबत वसुंधरा राजेंना शह देऊन स्वतःकडे संपूर्ण राज्याची सूत्र घेण्याची योजना आखली होती. मोदी-शहांच्या या राजकारणाला मुरलेले राजकारणी अचूक ओळखून आहेत. त्यापैकी एक म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांना राजस्थानमधील राजकारणावरून सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सर्व राज्यांमध्ये गुजरातनेच सत्ता करावी का?”

 

News English Summary: Why should Gujarat rule all states? says Bengal CM Mamata Banerjee in veiled attack on PM Narendra Modi over political turmoil in Rajasthan.

News English Title: Why should Gujarat rule all states says West Bengal CM Mamata Banerjee News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x