25 April 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण

Madhya Pradesh, CM Shivraj Singh Chouhan, Tests Corona Positive, Covid 19

भोपाळ, २५ जुलै : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौहान यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर ही माहीती शेअर केली आहे. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.

“माझ्यामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची करोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावे” असे आवाहन शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. सर्व नियमांचे पालन करुन क्वारंटाइन होणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. त्यांनी सर्व नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मध्य प्रदेश आतापर्यंत कोरोनाचे २६ हजार २१० रुग्ण आढळले आहेत. यात ७ हजार ५५३ सक्रीय रुग्ण आहे. तर इतर १७ हजार ८६६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात ७९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ४८ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १ लाखांची वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी दिवसाला कोरोना रुग्ण वाढत आहेत.

 

News English Summary: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has contracted corona. Chauhan was tested for the corona virus. His corona test report has come back positive. The Chief Minister has shared this information on social media.

News English Title: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan Tests Positive For Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x