26 April 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

स्वतःची बाईक आहे?..डबलसीट प्रवास होतो? हा आहे केंद्र सरकारचा नवा नियम

New rule formed, Center government, Double seat, Two wheeler

नवी दिल्ली, २५ जुलै : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील अपघाताचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षात हे प्रमाण कमी करण्यात चीनला मोठं यश आलं आहे. तर, तुलनेनं भारतामध्ये अपघाताचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी असं अनेकांनी यापूर्वी मत व्यक्त केलं आहे.

भारतातील अपघातांचे प्रमाण हे चीनपेक्षाही जास्त आहे. सन २००५ साली चीनचे अपघाताचे प्रमाण ९४ हजार आणि भारताचे ९८ हजार होते. सध्या चीनमधील अपघातांचे प्रमाण ४५ हजारांवर आहे. तर भारताचे १.५० लाखांवर आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेचं केवढं मोठं आव्हान देशासमोर आहे याचा अंदाज येतो.

त्यामुळे भारतातले अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता सुरक्षेसाठी या गोष्टींचे पालन सगळ्यांनी करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. आताबाईकवर डबलसीट म्हणजेच मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी फुटरेस्ट असणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात. बाईकवर आता मागे कंटेनरही लावता येणार आहे. त्याची लांबी ५५० एमएम तर रुंदी ५१० एमएम आणि उंची ५०० एमएम पेक्षा जास्त नसावी. अशा प्रकारचे कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही. त्याचबरोबर ३.५ टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचे पालन नव्या गाड्या तयार करतांना करावे लागणार आहे

 

News English Summary: Now, double seat on the bike means that there are hand holders on both sides for those sitting in the back. It has also been made mandatory to have footrests to keep the feet on both sides.

News English Title: New rule formed by center government for double seat on two wheeler News Latest Updates.

हॅशटॅग्स

#TrafficRules(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x