29 March 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

चिंताजनक! मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममधील २९ गतीमंद मुलांना कोरोनाची लागण

29 kids, Children home, Corona virus

मुंबई, २६ जुलै: राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर काल २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे. काल मुंबईत १ हजार ९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता आता १ लाख ७ हजार ९८१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७८ हजार ८७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुसरीकडे, कोरोना विषाणूने मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये देखील शिरकाव केला आहे. मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील २९ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या शेल्टर होममधील ८० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे.

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठी शेल्टर होम असून त्यात लहान मुलांपासून वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात आले आहे. या सुधारगृहात सध्या २६८ मुल असून त्यातील ८० जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यातील २९ गतीमंद मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, लागण झालेल्या मुलांमधील काहींना रक्तदाब, मधुमेह आणि क्षयरोगाचाही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनासह इतर आजार असलेल्या मुलांना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

या मुलांना कोणामुळे कोरोना झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी या शेल्टर होममध्ये काम करणाऱ्या मुलांना कोरोनाची लागण कोणामुळे झाली? हे अद्याप कळू शकलेले नाही.

 

News English Summary: The corona virus has also infiltrated the Children’s Home in Mankhurd. 29 children have been infected with corona in a shelter home for the disabled in Mankhurd. The corona was tested on 80 people in the shelter home. His report was received on Sunday.

News English Title: 29 kids in children home got affected by corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x