26 April 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मॉर्डना कपंनीची कोरोना लस चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये....तर मोठं यश

Moderna company, Phase 3 test, Covid 19 vaccine

वॉशिंग्टन, २७ जुलै : कोरोना व्हायरसने जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कहर केला आहे. जगभरात कोरोना संक्रमणाचा आकडा 1 कोटी 60 लाखाहून अधिक आहे, तर मृतांची संख्या 6 लाख 44 हजारांहून अधिक आहे. दरम्यान, अमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे 1 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 68 हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी 24 तासांत अमेरिकेत 68 हजार 212 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,067 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमणाची संख्या 41,74,437 वर पोहोचली आहे. तर 1,46,391 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कॅलिफोर्निया, टेक्सास, अलाबामा आणि फ्लोरिडासारख्या दक्षिणेकडील आणि पाश्चात्य राज्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 12 दिवसांपासून, दररोज नवीन रुग्णांची संख्या 60,000 च्या वर गेली आहे. त्याचबरोबर, गेल्या 4 दिवसांपासून दररोज मृत्यूची संख्या 1 हजाराहून अधिक आहे.

दुसरीकडे मॉर्डना कपंनीने करोना व्हायरसविरोधात विकसित केलेल्या लसीची अंतिम टप्प्याची चाचणी आजपासून अमेरिकेत सुरु होणार आहे. या फेजमध्ये ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल. या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे.

मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या फेजमध्ये एकाचवेळी मोठया प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या फेजच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. या फेजमधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल. अमेरिकेला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १.४६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत दररोज करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. याआधी मानवी परिक्षणात मॉर्डनाची लस यशस्वी ठरली होती.

स्वयंसेवकांच्या शरीरात व्हायरचा खात्मा करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीजची निर्मिती झाली होती. फेज ३ च्या चाचणीआधी मॉर्डनाला अमेरिकन सरकारकडून लस निर्मितीसाठी मदत म्हणून ४५ कोटीपेक्षा जास्त डॉलर्सचा निधी मिळाला आहे. अमेरिकेने मॉर्डनला लस कार्यक्रमासाठी आतापर्यंत १ अब्ज डॉलर्सचा निधी दिला आहे. ३० हजार स्वयंसेवकांपैकी निम्म्या १५ हजार लोकांना १०० मायक्रोग्राम लसीची डोस देण्यात येईल. उर्वरित स्वयंसेवकांना प्लासीबो देण्यात येईल. प्रतिवर्षी ५० कोटी लसीचे डोस बनवण्याचे मॉर्डनाचे लक्ष्य आहे.

सर्व काही ठरल्यानुसार घडले तर सप्टेंबरपर्यंत करोना व्हायरसला रोखणारी लस उपलब्ध होऊ शकते. अमेरिकेने पीफायझर आणि जर्मन बायोटेक कंपनी बायोएनटेक एसई बरोबर करार केला आहे. त्यानुसार या कंपन्यांना १० कोटी लसींच्या पुरवठयासाठी अमेरिकेकेडून १.९५ अब्ज डॉलरचा निधी दिला जाईल. या दोन कंपन्या मिळून करोना व्हायरसवर लसची निर्मिती करत आहेत. पीफायझर आणि बायोएनटेक बरोबर केलेल्या करारानुसार, अमेरिकन सरकारला अतिरिक्त ५० कोटी लसींची सुद्धा खरेदी करण्याची मुभा आहे. अमेरिकेच्या आरोग्य, मानवी सेवा आणि संरक्षण खात्याने ही माहिती दिली.

 

News English Summary: This is the most important stage for modernity. This is because in this phase, a large number of human tests will be conducted simultaneously. Much will depend on the outcome of this phase. This phase will prove the effectiveness and usefulness of the vaccine.

News English Title: Moderna company Phase 3 test of covid 19 vaccine got success News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x