19 April 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

Palghar Sadhu massacre, All petitions, Heard together, Supreme court

नवी दिल्ली, २७ जुलै : महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात दोन साधूंसह चालक अशा तीन जणांना ठार मारले गेले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारे दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय / एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. १६-१७ एप्रिलच्या रात्री दोन साधू आपल्या ड्रायव्हरसह गावातून जात होते तेव्हा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता.

 

News English Summary: The Supreme Court will hold a joint hearing on all the petitions filed in the notorious Palghar mob lynching case in Maharashtra. Three people, including a driver and two monks, were killed in the massacre.

News English Title: Palghar Sadhu massacre all petitions will be heard together in the supreme court News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x