29 March 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

देशभरात ४७ हजार ७०४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ६५४ रुग्णांचा मृत्यू

India, Covid 19, Corona Virus, Covid19 Vaccine

नवी दिल्ली, २८ जुलै : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार १५७ करोनाबाधितांमध्ये ४ लाख ९६ हजार ९८८ अॅक्टिव्ह रुग्ण, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेले ९ लाख ५२ हजार ७४४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३३ हजार ४२५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच घटली आहे. राज्यात काल ८७०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ७९२४ नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७९२४ नवे रुग्ण आढळून आलेत. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८३७२३ एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत १३८८३ जणांचा मृत्यू झाला. आज ८७०६ जणांना सुटी देण्यात आली आहे. मुंबईत आज १०२१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ११०१८२ वर गेली आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ९ लाख २२ हजार ६६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, ४४ हजार १३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४७ हजार ५९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

News English Summary: The prevalence of corona virus is still increasing rapidly in the country. India is currently ranked third in the list of countries affected by the Corona outbreak. In the last 24 hours, 47,704 new corona positive patients have been found across the country, while 654 people have died due to corona.

News English Title: 47704 Corona Positive Cases 654 Deaths In India In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x