29 March 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

कोणी टरबुज्या, चंपा म्हटल्यास जोरदार प्रतिउत्तर देण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

BJP, Shivsena, Social Media, Tarbuja, Champa

मुंबई, २८ जुलै : काल झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली होती.

दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या होत्या. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेकदा वादविवाद रंगत असतात. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या बाजूने समोरच्याला उत्तर देतात. आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचं भान राखत आक्रमक पद्धतीने काम करावं, टीकेला जशास तसे उत्तर द्यावं असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

भाजप प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते, यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनामध्ये लोकांना मदत करुन राज्य सरकारविरोधात आंदोलन केले, आगामी काळात विविध मुद्द्यांवरुन पक्षाला आंदोलन करावं लागेल, कोरोनाच्या लढाईत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी मदत करावी, लोकांच्या अडीअडचणीला धावून जा, सामान्य माणसांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच सत्ताधाऱ्यांनी मृतदेहाच्या बॉडी बॅगचा भ्रष्टाचार सुरु केला, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केले आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे, कोरोना काळातील भ्रष्टाचार उघड करावा लागेल, खूप मोठी राजकीय लढाई लढावी लागणार आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कोणी टरबुज्या म्हणतं, चंपा म्हणतं पलटवार केला पाहिजे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

News English Summary: Meanwhile, there are frequent debates on social media between ruling and opposition activists. Activists on both sides respond to the front on behalf of their respective parties.

News English Title: Order to give aggressive answer to Opposition Party workers criticism by BJP News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x