25 April 2024 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अविनाश जाधवांना २ दिवसांची पोलीस कोठडी, महाराष्ट्र सैनिकांची एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी

MNS Avinash Jadhav, Tadipar notice, Police custody

ठाणे, १ ऑगस्ट : मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना आज (1 ऑगस्ट) ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अविनाश जाधव यांना काल (31 जुलै) ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अविनाश जाधव यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सोमवारी ३ ऑगस्टपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

“हा सर्व प्रकार राजकारणातील सूड बुद्धीने केलेला आहे. मौका सभी को मिलता है, एकवेळ सत्ता आमची देखील असेल, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरु,” असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला. दुसरीकडे मनसेमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खदखद वाढली असून आगामी काळात त्याचे राजकीय परिणाम देखील दिसतील असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. स्वतः राज ठाकरे देखील या प्रकरणात लक्ष घालून असल्याचं वृत्त आहे. ठाण्यात कोरोना विक्रम रचत असताना ठाण्याच्या पालकमंत्र्यांवर टीका सुरु झाली होती आणि दुसरीकडे मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर लोकांना सहकार्य करताना दिसत होते. त्यामुळे हे राजकीय दबावतंत्र वापरलं गेल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: While taking Avinash Jadhav from Kapoor Bawdi police station to appear in court, Maharashtra Sainiks showered flowers on him. At this time, Mansainiks shouted slogans against Thane Guardian Minister Eknath Shinde.

News English Title: MNS Avinash Jadhav Tadipar notice get 2 days police custody by thane court News Latest updates.

हॅशटॅग्स

#AvinashJadhav(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x