19 April 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

सुशांत प्रकरण | संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा - भाजपाची मागणी

MP Sanjay Raut, Minister Aaditya Thackeray, BJP, Sushant Singh Rajput, Narco Test

मुंबई, १० ऑगस्ट : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे’ असं वक्तव्य राऊत यांनी केले होते.

दरम्यान, भाजप पक्षाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे? असा सवाल केला आहे. याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. भाजपा नेते म्हणाले की, सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यचं नव्हे तर या प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या प्रकरणात मौन सोडलं पाहिजे. वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत. सीबीआयने या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: BJP leader said that the CBI should grill Shiv Sena MP Sanjay Raut and Maharashtra Tourism and Environment Minister Aaditya Thackeray in connection with the death of Bollywood actor Sushant Singh Rajput. Bihar BJP spokesperson Nikhil Anand went on to suggest that the CBI should subject Sanjay Raut and Aaditya Thackeray to narco-analysis.

News English Title: Bihar BJP spokesperson Nikhil Anand went on to suggest that the CBI should subject Sanjay Raut and Aaditya Thackeray to narco analysis News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x