29 March 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत सरकारही नाही | सध्या ऑनलाईनच मार्ग

Schools Reopen, Lockdown, Corona Virus

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट : भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. २४ तासांत ५३ हजार ६०१ नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा ४५ हजार २५७ वर पोहोचला आहे. देशात सध्या ६ लाख ३९ हजार ९२९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील २२ लाख ६८ हजार ६७६ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखात असल्याचं वृत्त होतं. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र आता ती शक्यता धूसर असल्याचं वृत्त आहे.

सोमवारी शिक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीची बैठक झाली. राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीत शाळा-महाविद्यालये सुरू करणे आणि पुन्हा परीक्षा घ्यावी का? या विषयांवर चर्चा झाली. या व्यतिरिक्त कोरोना महामारीमुळे शाळा बंद पडल्याने मुलांना पोषण आहार मिळत नसल्याची चिंता देखील व्यक्‍त केली गेली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी समितीला सांगितले की, शाळा उघडण्याची सध्या कोणतीही योजना नाही. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार आणि सर्व राज्यांच्या अभिप्रायानुसार शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल असं अधिकारी म्हणाले.

दरम्यान नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्याच्या परिस्थितीत बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास अनुकूल नाहीत. स्थानिक मंडळांनी केलेल्या सर्वेक्षणात पालकांना १ सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्यास त्यांचे मत काय आहे असा प्रश्न विचारला गेला. या सर्वेक्षणात देशातील विविध भागातील २५ हजाराहून अधिक लोकांची प्रतिक्रिया घेण्यात आली. पहिल्या प्रश्नात १ सप्टेंबरपासून १०-१२ वी आणि १५ दिवसांनंतर ६-१० वी वर्गांसाठी शाळा उघडण्याचे ठरविले गेले तर आपली भूमिका काय असा प्रश्न विचारला. यावर, ५८ टक्के लोकांनी असहमती दाखवत शाळा सुरु नये अशी भूमिका घेतली. केवळ ३३ टक्के लोकांनी शाळा सुरु करण्याच्या बाजूने कौल दिला तर ९ टक्के लोकांनी कोणतेही स्पष्ट मत व्यक्त केले नाही.

 

News English Summary: A meeting of the Parliamentary Committee of the Ministry of Education was held on Monday. Should schools and colleges be started and re-examined in the Standing Committee meeting chaired by Rajya Sabha MP Vinay Sahasrabuddhe? These topics were discussed.

News English Title: Central Government is not take Chance to Reopen School from September 1 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x