18 April 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यात शाळांबाबत निर्णय | शिक्षणमंत्र्यांची माहिती

Schools, Reopen, Education Minister Varsha gaikawad

अहमदनगर, १७ ऑगस्ट : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहावर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, १५ जूनला अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर तेथे मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. यामुळे केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. आता केंद्र सरकारच्या सूचना आल्याशिवाय राज्यात शाळा सुरू होणार नाहीत. शाळा सुरू करण्याबाबत पालक व शिक्षण संस्थांचा संमिश्र प्रतिसाद असून स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. १० वी व १२ वीच्या मुलांचे महत्वाचे वर्ष असून त्यांचा ताण कमी करण्यासाठी मुलांसोबत कनेक्टीव्हीटी वाढविण्याबाबत शिक्षकांनी प्रयत्न करावेत. फक्त स्मार्टफोनच नाही तर साध्या फोनमार्फतही शिक्षक मुलांशी संवाद साधून त्यांचा ताण कमी करू शकतात.

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत देखील वक्तव्य केलं. “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत,” अशी प्रतिक्रिया राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “मुंबई पोलिसांची तुलना हे स्कॉटलँडच्या पोलिसांसोबत होते. त्याच मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केला जात आहे,” असेही त्या म्हणाल्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. याची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. त्यावर वर्षा गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, “मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे. ते सत्यता बाहेर आणतील,” असे त्या म्हणाल्या.

 

News English Summary: The decision to start schools in the state will be taken only after receiving the guidelines from the central government. However, we are making efforts so that the year of the students is not wasted, informed the Minister of School Education, Varsha Gaikwad.

News English Title: Decision on schools only after the suggestion of the Center, information of the Minister of Education Varsha Gaikawad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#VarshaGaikawad(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x