20 April 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर | मोदी सरकारकडून अखेर कबुली

Ladakh Situation, Foreign minister S Jaishankar

नवी दिल्ली, २७ ऑगस्ट : एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर चीन बरोबर सीमावादावर तोडगा निघू शकतो असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या मुद्यावर भारताची भूमिका काय आहे ते जयशंकर यांनी स्पष्ट केले. “१९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे” असे जयशंकर म्हणाले.

लडाखसह सीमेवरील वादामध्ये एकतर्फी तोडगा निघता नये. यामध्ये प्रत्येक सामंजस्य कराराचा सन्मान व्हायला हवा, असे जयशंकर म्हणाले. गेल्या दशकभरात अनेकदा चीनसोबत सीमा वाद उद्भवला आहे. डेपसांग, चूमर आणि डोकलाम. काही ठिकाणी हा वाद वेगळ्या प्रकारचा होता. सध्याच्या वादही अनेक बाबतीत वेगळा आहे. प्रत्येक वादावेळी एकच गोष्ट समोर येते, की तोडगा हा चर्चेद्वारेच काढला गेला पाहिजे. आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजनैतिक दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहोत. दोन्ही गोष्टी सोबत पुढे जात आहेत, असेही जयशंकर यांनी सांगितले.

सीमा व्यवस्थापनासाठी दोन्ही देशांमध्ये असलेले प्रोटोकॉल आणि आधीपासून असलेले करार त्या आधारावर सीमावादावर तोडगा काढावा अशी भारताची भूमिका आहे. सीमावाद सुरु होण्याआधी लिहिलेल्या या पुस्तकात भारत-चीन भविष्याचे कसे चित्रण केले आहे? या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, ‘दोन्ही देशांसाठी संबंध खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी रणनिती आणि दूरदृष्टीची गरज आहे’

दरम्यान, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवर य़ुद्धसदृष्य परिस्थिती असल्याचे संकेत दिले होते. सांगितले की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य़ कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले होते.

 

News English Summary: Foreign minister S. Jaishankar has called the situation in Ladakh the “most serious” since the 1962 conflict. “This is surely the most serious situation after 1962. In fact, after 45 years, we have had military casualties on this border. The quantum of forces currently deployed by both sides at the LAC is also unprecedented,” Jaishankar told Rediff.com in an interview ahead of the release of his book.

News English Title: Ladakh Situation Most Serious Since 1962 Troop Levels Unprecedented Foreign minister S Jaishankar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x