28 March 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमकी

Film director Mahesh Manjrekar, ransom case

मुंबई, २७ ऑगस्ट : मराठी अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते.

दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रात्री मांजरेकर यांना 35 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, त्यांनतर त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या पुढील तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक तपास करत आहे. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

 

News English Summary: Bollywood filmmaker Mahesh Manjrekar has complained to Mumbai Police about receiving messages demanding Rs 35 crore from a person claiming to be a member of Abu Salem’s gang, an official said on Thursday. An offence has been registered and transferred to the police’s Anti-Extortion Cell, he said.

News English Title: Message film director Mahesh Manjrekar ransom case registered at Dadar Police station News Latest Updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x