25 April 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

आमच्याशी स्पर्धा कराल तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल - चीनची धमकी

India China, China Threatens, Indian Army, 1962 Global Times

नवी दिल्ली, १ सप्टेंबर : भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.

भारताने सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करत अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडला असल्याचा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केली नसल्याचाही दावा केला आहे.

चीनने ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये भारताकडूनच सर्वात प्रथम घुसखोरी प्रयत्न केला आणि संघर्षासही सुरुवात केली असा दावा केला आहे. शक्तिशाली चीनचा सामना करताना अमिरिकेतून याप्रकरणी काही पाठिंबा मिळेला या भ्रमात राहू नका असंही चीनने म्हटलं आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मी देशाच्या इंचनइंच जमिनीचं संरक्षण करण्यास सज्ज आहे. भारत एका सामर्थ्यशाली चीनचा सामना करतोय, हे त्यांना लक्षात ठेवावं. आमच्याकडे पुरेसं सैन्य आहे. चीन भारताला संघर्षासाठी चिथावणी देत नाही. मात्र आम्ही आमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही. चिनी जनता सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

 

News English Summary: The Chinese government’s mouthpiece, the Global Times, has openly threatened India. If India wants to compete with us, they will have to bear more losses than in 1962, the Global Times has warned.

News English Title: China Threatens Indian Army Make India Suffer More Severe Losses Than It Did In 1962 Global Times News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x