29 March 2024 8:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

पंतप्रधान मोदी देखील ऑफिसमध्ये बसूनच काम करत आहेत - आ. रोहित पवार

CM Uddhav Thackeray, MLA Rohit Pawar, Marathi news ABP Maza

मुंबई, २ सप्टेंबर : प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली असल्याचे बोलले जात आहे.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has responded to this criticism of Praveen Darekar. Chief Minister Uddhav Thackeray is saying that he does not go out of the house. Then where is Prime Minister Narendra Modi. Rohit Pawar has raised the question whether he also works in the office.

News English Title: NCP MLA Rohit Pawar has criticized BJP leaders after targeting CM Uddhav Thackeray marathi news live latest updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x