19 April 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

एकाबाजूने चीन तर दुसरीकडून पाकिस्तानही हल्ला करणार | बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

India China, Pakistan, CDS Bipin Rawat, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर : लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे.

जर चीनने भारतावर हल्ला केला तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानकडूनही घेतला जाण्याची शक्यता रावत यांनी वर्तविली आहे. (Threat of China-Pak calibrated action against India) यासाठी भारतीय सैन्याला तयार रहावे लागणार आहे. चीन आणि पाकिस्तानमधील पीओके क्षेत्रातील सहकार्याच्या घडामोडींवर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. दोन्ही बाजुंनी हल्ला होण्याची शक्यता असून चीनच्या काही आक्रमक हालचाली जाणवू लागल्याचे रावत यांनी सांगितले.

भारत आणि अमेरिकेमधील तिसरी रणनीती सहकार्य फोरमध्ये बोलताना त्यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने आपल्याविरोधात एकप्रकारचे युद्धच छेडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसविण्यासह भारताच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद पसरविण्याचे काम करत आहे. आता पाकिस्तान उत्तरेकडील सीमेवरही संकटे आणू पाहत आहे. असे केल्यास त्याचे मोठे नुकसान पाकिस्तानला झेलावे लागणार आहे, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.

भारताला पूर्व आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजुने एकाचवेळी हल्ला होण्याचा धोका सांगताना रावत यांनी यावर तयारी करण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्य दले या दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहणार आहेत. भविष्यासाठी ही तयारी करावी लागणार आहे, असे ते म्हणाले. आम्हाला एलएसीवर शांतता हवी आहे. मात्र, चीन आक्रमक पद्धतीने हालचाली करत असून आम्हीही त्याला चोख प्रत्यूत्तर देण्याची ताकद ठेवून आहोत. अमेरिकेने भारताला अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक सारखे हेलिकॉप्टर दिले आहेत. हे सैन्य सामुग्री सहकार्य पुढेही सुरुच राहिल असे रावत म्हणाले.

दरम्यान, डाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये लडाखमधील पँगाँग सरोवराच्या परिसरात चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत अनेकदा घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. यामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी माजी हवाईदलप्रमुख भुषण गोखले, माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. यावेळी माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे नेतेदेखील उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी भारत-चीनमधील सद्यस्थितीवर आपापली मते मांडली.

 

News English Summary: In Ladakh, China is in the mood to go to war. As a result, India has started stepping up military assistance in the LAC areas, including Arunachal Pradesh, a big warning given by CDS General Bipin Rawat.

News English Title: Not only China Pakistan will also attack on CDS India Bipin Rawat serious warning Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x