19 April 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सुशांतचा मॅनेजर एनसीबीच्या ताब्यात | अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

Sushant Singh Rajput, Death Case, Samuel Miranda, Narcotics Control Bureau, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या ऑफिसला एन सी बी घेऊन निघाले. सकाळी सातपासून सॅम्युअलची मिरांडाच्या घरी चौकशी सुरू होती. मिरांडा सुशांत सिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर होता. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीमध्ये २० मिनिटं संवाद झाल्याचं समोर आलं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी दाखल झाली होती. सुशांत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत एनसीबीचा तपास सुरू आहे. त्यासाठी पाच सदस्यीय टीम झाडाझडतीसाठी रियाच्या घरी दाखल झाली आहे. मुंबई पोलीस देखील एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी तपास करत आहेत.

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.

 

News English Summary: Sushant Singh Rajput’s former housekeeping manager, Samuel Miranda, was on Friday detained by the Narcotics Control Bureau (NCB) in connection with its probe into the drug angle in the case, news agency ANI reported. Miranda, whose house was searched by the bureau, was detained under the provisions of the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985, ANI said.

News English Title: Sushant Singh Rajput Death Case Samuel Miranda Detained By Narcotics Control Bureau Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x