20 April 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
x

नारदमुनी हे प्राचीन काळातील 'गुगल': गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी

अहमदाबाद : भाजप नेत्यांची मुक्ताफळं उधळणं सुरूच असून आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नारदमुनी म्हणजे त्याकाळातील गुगलच असा जावई शोध आणि निष्कर्ष काढला आहे.

भाजपचे अनेक मुख्यमंत्री रोज नवनवीन वादग्रस्त विधानं करत आहेत. अहमदाबादमध्ये आरएसएसच्या शाखा विश्व संवाद केंद्राकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं, त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले की,’गुगलला ज्याप्रकारे संपूर्ण संपूर्ण जगाची माहिती आहे, तशाच प्रकारे नारदमुनींना संपूर्ण जगाची माहिती असायची’. ‘नारदमुनी अशी व्यक्ती होती, जिच्याकडे संपूर्ण जगाची माहिती होती. ते माहितीवर काम करायचे. मानवतेच्या भल्यासाठी ते सर्व माहिती गोळा करायचे आणि या कामाची खूप आवश्यकता होती,’ असं विधान मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केलं.

काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी महाभारत काळात इंटरनेट होतं असं विधान केलं होत. अमेरिका किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशानं नव्हे, तर भारतानं शेकडो वर्षांपूर्वीच इंटरनेटचा शोध लावला होता, असा जावई शोध त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावला होता आणि त्यानंतर भाजपवर देशभरातून टीका झाली होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x