26 April 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

हिमाचल प्रदेशात चीनच्या हालचाली | हिमाचलमधील भाजपचा PPE Kit घोटाळा | आणि कंगना

Himachal Pradesh, Kangana Ranaut, China, PPE Kit Scam, Marathi News ABP Maza

मनाली, १० सप्टेंबर : लडाखमध्ये ताबा रेषेवर (LAC) चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर, चर्चा सुरू करून तणाव कमी करण्याचा दिखावा करणाऱ्या चीनने हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून रस्ता तयार केला आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील कुन्नू चारंग हे शेवटचे सीमावर्ती गाव आहे. कुन्नू चारंगच्या ग्रामस्थांनी चीनच्या प्रदेशात रेकी केल्यावर हा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर सुमारे २० किलोमीटर लांब रस्ता बनवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे गलवाण खोऱ्यात झालेल्या रक्तपातात भारतच जवान शहीद झाले होते त्यात हिमाचल प्रदेशातील सुपुत्र सेपॉय अंकुश ठाकूर हे देखील शहीद झाले होते. मात्र गलवाण घटनेनंतर चीनच्या हिमाचल मधील हालचाली अधिक वाढल्या असून याच राज्याच्या सीमेवर चिनी सैन्य उभं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या असून उद्या येथून चीनने पुन्हा काही आगळीक केल्यास मोदी सरकार कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

त्यानंतर हिमाचल प्रदेशात देखील कंगनाचा विषय तापवण्याचा तिथल्या भाजप सरकारने चंग बांधल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेश सरकारकडून अभिनेत्री कंगना रणौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील भाजपच्या सरकारकडे कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तिला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तास प्रस्ताव केंद्राकडे तडकाफडकी पाठवला होता.

हिमाचल प्रदेशात भाजपाची सत्ता असून त्यांचे एकूण ४४ आमदार असून काँग्रेसची देखील राज्यात बऱ्यापैकी ताकद असून त्यांचे आमदार आहेत. आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री देखील यावादात उतरले आहेत. ‘आम्ही हिमाचलच्या मुलीचा अपमान सहन करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारनं हिमाचलची मुलगी कंगना रानौत हिच्यासोबत राजकीय सूडाच्या भावनेतून केलेला अत्याचार अत्यंत चिंताजनक तसंच निंदनीय आहे. आमचं सरकार आणि देशातील जनात या घटनाक्रमात हिमाचलची मुलगी कंगनासोबत आहोत’ असं ट्विट मुख्यमंत्री ठाकूर यांनी केलं आहे. ठाकूर यांच्या ट्विटमुळे दोन राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे आणि हिमाचलमध्ये देखील कंगनाचा विषय उचलून धरण्यास सुरुवात झाली आहे.

चीनच्या हिमाचल प्रदेशात हालचाली वाढल्या आहेत आणि त्यात हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या संकटातही घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला, ज्याबाबत मे महिन्यापासून भाजपच्या नेत्यांची नावं पुढे येत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाने राजीनामा दिला आहे. हिमाचल प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठविला होता. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.

विशेष म्हणजे या घोटाळ्यावरून आरोग्य संचालक अजय गुप्ता यांनी आधीच अटक करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात भाजप विरोधी वातावरण तापलं असताना कंगनाचा मुद्दा आयता चालून आला आणि त्याला हिमाचल मधून हवा देण्याची तयारी भाजपकडून झाल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे चीनचा मुद्दा जो हिमाचल प्रदेशात चर्चेचा विषय बनला आहे आणि राज्यातील कोरोना संबंधित घोटाळ्यांमुळे राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार अडचणीत सापडलं आहे. मात्र भाजपशी जवळचे संबंध असलेली कंगना रानौत देखील या अघोषित अभियानात सामील झाल्याचं म्हटलं जातं आहे. त्यासाठी ती मुंबईतील घटनांमध्ये हिमाचल प्रदेशचा उल्लेख आवर्जून करत आहे. त्यामुळे विरोधकांनी या चलाख राजकारणाला ओळखणं आणि त्याला हाणून पाडणं गरजेचं आहे.

 

News English Summary: There was a bloody clash between Chinese troops and Indian troops on the Line of Control (LAC) in Ladakh. After this, China, pretending to reduce tensions by initiating talks, has built a road along the Himachal Pradesh border. Kunnu Charang is the last frontier village in Kinnaur district of Himachal Pradesh. The villagers of Kunnu Charang have made this claim after practicing Reiki in Chinese territory. In the last two months, villagers had said that China had built about 20 kilometers of road on the border.

News English Title: What is the Himachal Pradesh politics behind Kangana Ranaut Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x